दिवसभराचा कोरोनाचे अपडेट..

Foto

आज दिवसभरात ८० रुग्ण; जिल्ह्यात ११९३ वर उपचार सुरू

 औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ८० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आणखी चिंतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पहाता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३११६ वर जाऊन पोहचली आहे. 
कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा अहवालानुसार आतापर्यंत १७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ११९३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

दिवभरात आढळलेले ८० रुग्ण या भागातील

घाटी हॉस्पीटल परिसर -१, नॅशनल कॉलनी-१, सिंधी कॉलनी-१, पहाडसिंगपुरा-१, न्यू हनुमान नगर-१, पडेगाव-१, लक्ष्मी कॉलनी -२, हर्सुल, जटवाडा-१, म्हसोबा नगर, मयूर पार्क -१, खोकडपुरा-३ , जय भवानी नगर, गल्ली नं. चार-२, एन आठ सिडको -२, एन नऊ,सिडको -२, महू नगर-१, गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा-१, शिवाजी नगर, गारखेडा -१, एन बारा, हडको-१, कैसर कॉलनी -३, चिकलठाणा-१, नंदनवन कॉलनी -२, मिसारवाडी-१, नूतन कॉलनी -२, गांधी नगर-१, मुकुंदवाडी -१, सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर -१, नागेश्वरवाडी -१, श्रीराम नगर -१, रामेश्वर नगर -१, न्यू विशाल नगर-१, आझाद चौक-३, पुंडलिक नगर-१, स्वामी विवेकानंद नगर -१, हरीकृष्ण नगर, बीड बायपास-१, श्रीविहान कॉलनी -१, शक्ती अपार्टमेंट -१, गणेश कॉलनी -२, एमजीएम हॉस्पीटल परिसर -१, जाधववाडी, नवीन मोंढा-१, साई नगर, सिडको -१, टीव्ही सेंटर -१, सावित्री नगर, चिकलठाणा-१, बन्सीलाल नगर-१, औरंगपुरा -१, सुभाषचंद्र नगर, एन अकरा-१, जय भवानी नगर, गल्ली नं. एक-१, रामदेव नगर -१, बजाज नगर-२, सावरकर कॉलनी, बजाज नगर -१, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर -१, इंदिरा नगर, पंढरपूर -२, जय भवानी चौक, बजाज नगर-५ सिडको महानगर दोन-१, एन सहा सिडको-१, सदाद कॉलनी-१, गजानन कॉलनी, गारखेडा परिसर -१, कोतवालपुरा, खडकेश्वर-१, पवन नगर, हडको-१, अझम कॉलनी -१, नारेगाव-१, मनपा परिसर-१, उदय कॉलनी -१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३३ स्त्री व ४७ पुरूष आहेत. 

घाटीत चार, खासगीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) सिडकोतील आंबेडकर नगर येथील ३३ वर्षीय स्त्री, समता नगरातील ५५ वर्षीय स्त्री, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील ५७वर्षीय स्त्री, तसेच कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत १२६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी १२४ कोरोनाबाधित रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील होते. 
तर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये गणेश कॉलनीतील ८१ वर्षीय स्त्री रुग्णाचा तर रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील १२४, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ४५ , मिनी घाटीमध्ये १ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १७० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.